दैनिक स्थैर्य । दि. ०५ ऑगस्ट २०२२ । बिबी । ग्रामपंचायत बिबीच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या “हर घर तिरंगा” या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बिबीचे सरपंच सौ. प्रिती काशीद, ग्रामसेवक एस. एस. जाधव, उपसरपंच सचिन बोबडे, सदस्य विशाल बोबडे, सामाजिक कार्यकर्ते बळवंत नलवडे, महिपती बोबडे, तात्याबा कोळपे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.