
दैनिक स्थैर्य | दि. ०३ फेब्रुवारी २०२३ | फलटण | विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रविवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी वाठार निंबाळकर येथील स्वप्नशिला मंगल कार्यालयात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. नाबार्ड योजनेचे प्रा. महेंद्र खरात, कृषी योजनेचे राहुल कांबळे हे यावेळी प्रमुख व्याख्याते असणार आहेत. यावेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद माजी सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर हेही शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यास श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, मोहनराव लोखंडे, पै. बापूराव लोखंडे, पै. गोरख सरक, रामभाऊ ढेकळे, आप्पासाहेब लोखंडे, दीपकराव गोडसे, मोहनराव निंबाळकर, विवेक शिंदे, शिवराज कदम, रामदास कदम, सुरेश रोमण, श्रीरंग चव्हाण, अभिजित निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी तालुक्यातील सर्व शेतकर्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वाठार निंबाळकरचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे संचालक व ग्रामस्थांनी केले आहे.