दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२२ । बारामती । ग्रामीण भागातील युवक युवती व गृहणीना दांडिया च्या माध्यमातून आपली कला प्रदर्शित करता यावी व त्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे म्हणून दांडिया स्पर्धेचे आयोजन केल्याचे ब्लॅक युनीसेक्स सलोन च्या संचालिका नेहा डोईफोडे यांनी सांगितले.
बारामती पेन्सिल चौक येथील ब्लॅक युनीसेक्स सलोन च्या वतीने बारामती क्लब व चिराग गार्डन येथे सदर दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी डोईफोडे असोसीएटचे संचालक नितीन डोईफोडे,नृत्य दिग्दर्शक अकबर शेख, युनूस इनामदार व परीक्षक रुबी खत्री, ऍड धीरज लालबिगे व इतर मान्यवर व बारामती, फलटण, दौंड, पुरंदर तालुक्यातील रसिक प्रेषक व दांडिया स्पर्धक उपस्तित होते.
या मध्ये बेस्ट मेल, बेस्ट फिमेल, बेस्ट, कपल, बेस्ट कीड, बेस्ट सोलो व बेस्ट ग्रुप अशी विविध बक्षिसे विजेत्यांना देण्यात आली. दि.01 ऑक्टोंबर 2022 ते 31 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत सलोनतर्फे सर्व सेवावर फ्लॅट 50% सवलत दिली जाणार आसल्याचे सौ नेहा नितिन डोईफोडे यांनी सांगितले.
दांडिया ला अनुसरून पेहराव, अभिनय, प्रत्येक गाण्यावरील ठेका धरण्याची पद्धत आदी बाबत निरीक्षण करून गुण दिले जातात त्यामुळे गुणवत्ता व दर्जा वाढतो पुणे मुबंई सारख्या मोठ्या शहरातील आयोजन आत्ता बारामती मध्ये सुद्धा आपण करू शकतो व दांडिया प्रेमी निर्माण होत आहे हि अभिमानाची बाब असल्याचे नितीन डोईफोडे यांनी सांगितले.
आभार युनूस इनामदार यांनी मानले.