दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२२ । फलटण । शारदाबाई पवार विद्यानिकेतन डे स्कूलमध्ये मराठी राजभाषा सप्ताहाच्या निमित्ताने पहिले पुष्प ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी चिऊकाऊची जगावेगळी कहाणी कथाकथन, मराठी भाषेचा गोडवा, इरसालपणा, रांगडेपणा, बोलीचा झटका व तडका यांचे असस्सल गावरान बोलीत विवेचन करुन बालचमू आनंदित झाले. मराठीतून सुद्धा आपले आयुष्य घडवता येते. मातृभाषा शिक्षण आपणांस सर्वोच्च स्थानावर पोहचविते.
चैतन्याचे कोवळे कोंब बालचमू (पाचवी ते सातवी) लहानपण देगा देवा, निरागसता, संवेदनशीलता खरंच धमाल. सूत्रसंचलन अंजली दिक्षित यांनी केले. प्रास्ताविक संतोष वाघ सर यांनी केले. समन्वय पंकज भैय्या उपस्थित सर्व शिक्षक वृंद होते.