
दैनिक स्थैर्य । 12 जुलै 2025 । फलटण । वडले, ता. फलटण येथील ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच सौ. रेश्माताई सोनवलकर, अविनाश सोनवलकर तसेच चव्हाणवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच प्रशांत शिंदे यांच्या उपस्थितीत माजी सरपंच सुकुमार चव्हाण, माजी सरपंच सुरेश जाधव, माजी उपसरपंच प्रदीप चव्हाण,
विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गोरख शिंदे, योगेश चव्हाण, सागर पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय जाधव, अंकुश चव्हाण, रामराजे युवा मंच, संस्थापक अनिल शिंदे (पिंपरी चिंचवड), राहुल चव्हाण यांच्यासह
शेकडो कार्यकर्त्यांनी राजे गटातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी फलटण तालुकाध्यक्ष पश्चिम अमित राणवरे, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.