ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२२ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतमधील राजीनामा, निधन, अनहर्ता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य पदांच्या पोट निवडणूकींसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असल्याचे तहसिलदार सर्वसाधारण सुषमा पैकेकरी यांनी कळविले आहे.

ग्रामपंचायतीतील रिक्त पदांच्या पोट निवडणुकांकरिता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाच्या निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

दि. 22 नोव्हेंबर 2021 पर्यत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करणे दिनांक. तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटिस प्रसिध्द करण्याचा दि. 22 नोव्हेंबर 2021. दि. 30 नोव्हेंबर ते दि. 6 डिसेंबर पर्यंत सकाळी 11 ते 3 वाजेपर्यत नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करणे ( नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ). दि. 7 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नामनिर्देशनपत्र छाननी संपेपर्यंत (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ) दि. 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेणे. (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी). दि. 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 नंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे. दि. 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 वा. पासून ते सांय 5.30 वा. पर्यंत मतदान. दि. 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी. (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील). दि. 27 डिसेंबर 2021 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक.


Back to top button
Don`t copy text!