
दैनिक स्थैर्य । १० मार्च २०२३ । सातारा । शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाई येथे केंद्र शासनामार्फत कौशल्य विकास केंद्र ही योजना लागू झाली असून या अंतर्गत मोफत अल्पमुदतीचे कोर्स चालू करण्यात आले आहेत. या सर्व कोर्सचा कालावधी तीन ते पाच महिने असणार आहे. नोकरी, रोजगार, कर्ज इत्यादीसाठी हे प्रमाणपत्र उपयुक्त ठरणार आहे. तसेच अल्पसंख्याक समुदाय जसे की नव बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन या समुदायासाठी रबर टेक्निशियन जुनियर हा कोर्स चालू केला असून जिल्ह्यात रबर विषयक हा एकमेव कोर्स सुरु करण्यात आला आहे. यासंदर्भात सर्वांना सविस्तर माहिती देऊन नोंदणी करण्यासाठी दि. 10 मार्च रोजी दहा ते तीन या वेळेत आयटीआय वाई, पी 17 एमआयडीसी वाई, मांढरदेवी रोड, भीमाशंकर हायस्कूल शेजारी, वाई येथे मेळावा आयोजित केला असून इच्छुक उमेदवारांनी आधार कार्ड, मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला,फोटो व इतर कागदपत्रासह संस्थेत उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य मिलिंद उपाध्ये यांनी केले आहे.
प्रवेश नोंदणी करण्याची अंतिम तारीख दि. 20 मार्च आहे. प्रवेश मर्यादित असल्याने इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा तसेच मेळाव्याला उपस्थित राहून माहिती घेऊन नोंदणी करावी असे आवाहन संस्थेचे प्राचार्य मिलिंद उपाध्ये यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई मोबाईल ९४२३३५६१८ येथे संपर्क साधावा.