
स्थैर्य, गिरवी, दि. 3 ऑक्टोबर : गिरवी आणि पंचक्रोशीतील दुग्ध व्यवसायाच्या विकासात गोविंद उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘गोविंद श्वेत क्रांती’चे मोलाचे योगदान आहे, असे गौरवोद्गार येथील ज्येष्ठ नागरिक व दुग्ध उत्पादक संतराम जाधव यांनी काढले.
येथील दसरा सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्रीफळ वाढवताना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व दुध उत्पादक शेतकरी अनिलकुमार कदम होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद श्वेत क्रांतीचे गिरवी येथील व्यवस्थापक सचिन कदम यांनी केले, तर सुत्रसंचालन वाहतूक व्यवस्थापक विवेक पवार यांनी केले. सुमित लोखंडे यांनी आभार मानले.
यावेळी दुध उत्पादक शेतकरी शरद कदम, राजेंद्र कदम, रामभाऊ कदम, अनिल निकाळजे, दुलेभाई मणेर यांच्यासह अनेक व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.