स्थैर्य, फलटण : सन १९९५ पासुन गोविंद मिल्क प्रॉडक्ट्स स्थापन झाल्यापासून काम करत असणारे कर्मचारी, दूध उत्पादक शेतकरी, बल्क कुलर धारक, सर्व वितरक व हितचिंतकांच्या सहकार्यामुळेच गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स आज प्रगतीपथावर आहे, असे प्रतिपादन गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी वर्धापन दिनानिमित्त आयोजित युट्युब लाईव्ह द्वारे केले.
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी युट्युब द्वारे दूध उत्पादक शेतकरी, बल्क कुलर धारक, वितरक व हितचिंतकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
दिनांक 18 सप्टेंबर हा गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचा वर्धापन दिन म्हणजेच स्थापना दिवस या दिनी आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्वांचे आभार व एक वर्धापन दिनाचा सोहळा आयोजन करायचे खरे तर या वर्षी ठरवलेले होते. परंतु संपूर्ण जगामध्ये आलेल्या कोरोना म्हणजेच कोव्हीड १९ या महामारी मुळे आपल्याला एकत्रित येता येत नाही, अशी खंत हि यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स मध्ये काम करत असणारे कर्मचारी, दूध उत्पादक शेतकरी, बल्क कुलर धारक यांच्या योगदानामुळे गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स हे प्रगतीपथावर असून आगामी काळातही सर्वांच्या सहकार्याने गोविंद मिल्क उंची गाठेल, यात कसलीही शंका नाही असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
सन १९९५ पासुन गोविंद मिल्ककडे दूध घालणारे दुध उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी आणि हितचिंतक हे सर्व चढ उतारांमध्ये गोविंदच्या बरोबर राहिले, त्यामुळेच गोविंद मिल्क आज 25 वा वर्धापन दिन साजरा करू शकत आहे. त्यांच्या शिवाय हा दिन साजरा करणे शक्यच नाही व मिल्क प्रॉडक्ट किंवा डेअरी व्यवसाय करणेही शक्य नाही असेही श्रीमंत संजीवराजे यावेळी म्हणाले.
कोरोनाच्या प्रसारावर मास्कच्या वापरामुळे काही प्रमाणात नियंत्रण येत असल्याचे तद्न्य स्पष्ट करीत आहेत. जर गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, अगदी अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडा. बाहेर पडल्यानंतर मास्क, सुरक्षित अंतर व इतर सरकारने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करा. स्वतः स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेतली तरच कोरोनाला आटोक्यात आणणे शक्य होईल. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या शासनाच्या धोरणाप्रमाणे सगळ्यांनी काळजी घ्या, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.
पुढील वर्षी गोविंद मिल्कच्या वर्धापन दिन साजरा करताना कोरोनाचे कोणतेही संकट नसेल, सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे व कोरोना पासून कोणालाही कसलाही त्रास होऊ नये अशी प्रार्थना मी सर्वांच्या वतीने प्रभू श्रीरामचंद्रांकडे करतो, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.