दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२२ । सातारा। गोविंद गांधी यांनी आयुष्यभर केवळ हिंदुहिताचा विचार आणि हिंदुमहासभेचे काम केले. त्यांची कार्यपध्दती आणि कार्य जसेच्या तसे चालविणे हिच त्यांना खरी श्रध्दांजली आहे. म्हणूनच महाराष्ट्र हिंदुमहासभेने गोविंद गांधी यांचा वसा आणि वारसा पुढे चालवावा, असे प्रतिपादन त्रंबकेश्वर (नाशिक) येथील रघुनाथ महाराज तथा फरशीवाले बाबा यांनी सातारा येथे बोलताना केले.
अखिल भारत हिंदुमहासभेची महाराष्ट्र प्रदेश कार्ययकारिणी आणि गोविंद गांधी परिवाराने कै. गोविंद गांधी यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आयोजित केलेल्या आदरांजली सभेत ते बोलत होते. गुजराती महाजनवाडा सभागृहात ही सभा झाली. अध्यक्षस्थानी हिंदुमहासभेचे प्रदेशाध्यक्ष अँड. गोविंद तिवारी होते. सुरुवातीस सातारा जिल्हाध्यक्ष धनराज जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नंतर फरशीवाले बाबा यांच्या हस्ते गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी विलासराव शिंदे (कोल्हापूर) , शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख निलेश शहा, हिंदुमहासभेचे पंढरपूर येथील नेते अभयसिंह कुलकर्णी, बार्शी येथील नेते अनिल पवार, मुख्य कार्यालयीन कार्यवाह हरिश्चंद्र शेलार, वासंती शेलार, कोल्हापूरचे ज्येष्ठ नेते संजय कुलकर्णी, सोळशी देवस्थान ट्रस्टचे हणमंतराव वाघ, डी.के. वडगावे, वसुधा पाटील, संगीतकार प्रीतम ओसवाल, प्रदेश प्रवक्ते आनंद कुलकर्णी, माजी अध्यक्ष अनुप केणी यांची श्रध्दांजलीपर भाषणे झाली.
पंढरपूर हिंदुमहासभेच्या वतीने देण्यात येणारा पुण्याचे हिंदुमहासभेचे महापौर गणपतराव नलावडे स्मृती पुरस्कार या कार्यक्रमात गोविंद गांधी यांना मरणोत्तर देण्यात आला. उमेश गांधी यांनी फरशीवाले बाबा यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. अभयसिंह कुलकर्णी यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
अध्यक्षीय भाषणात अँड. तिवारी यांनी गोविंद गांधींनी हिंदुमहासभेसाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. कार्यकर्ता कसा जपावा आणि घडवावा हे गोविंद गांधी यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले. त्यांनी जोडलेली हजारो माणसे म्हणजे त्यांच्या कार्याची पावतीच आहे. त्यांचा विचारच हिंदुमहासभेला बळकट करत राहिल, असेही ते म्हणाले. शेवटी प्रमुख कार्यवाह दत्तात्रय सणस यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला गांधी परिवार, ज्येष्ठ नेते विलासराव खानविलकर, कोषाध्यक्ष महेश सावंत, ठाणे जिल्हाध्यक्ष गोविंद पवार, जळगाव जिल्हाध्यक्ष रमेश सुशीर, अलका साटेलकर, राज्य कार्यकारिणी सदस्य मनोहर सोरप, राजेंद्र शिंदे, रेखा दुधाणे (कोल्हापूर), सत्वशीला सणस यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, रायगड, नाशिक, मुंबई, ठाणे, सोलापूर, बार्शी या जिल्ह्यातील हिंदुमहासभेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.