दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑगस्ट २०२२ । पुणे । स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन पुणे येथील हिरवळीवर सोमवारी पारंपरिक स्वागत समारोह व चहापानाचे आयोजन केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. राज्यपालांनी सर्व निमंत्रितांशी संवाद साधला व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. चहापानाचे आयोजन 4 वर्षानंतर करण्यात आले.
स्वागत समारोहाला खासदार गिरीश बापट, माजी आमदार मेधा कुलकर्णी, महापौर मुरलीधर मोहोळ, नॅकचे अध्यक्ष भूषण पटवर्धन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ कारभारी काळे, प्रकुलगुरु डॉ संजीव सोनवणे, अभिनेते विक्रम गोखले, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ शां. ब. मुजुमदार, सशस्त्र सैन्यदलाचे अधिकारी, डॉक्टर्स, पत्रकार, उद्योजक, प्रशासन तसेच पोलीस सेवेतील अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.