नवरात्रीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा


 

स्थैर्य, मुंबई, दि. १६ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नवरात्र व दुर्गा पूजा उत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

नवरात्रीच्या मंगलपर्वानिमित्त राज्यातील सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो तसेच सर्वांच्या सुख, समाधान व संपन्नतेसाठी शक्तीरुपिणी दुर्गामातेकडे प्रार्थना करतो. नवरात्रीचा उत्सव मातृशक्तीच्या विविध रुपांचे स्मरण देतो तसेच असत्यावर सत्याच्या विजयाची ग्वाही देतो, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संदेशात म्हटले आहे.

यंदा कोरोनामुळे आपण आव्हानात्मक परिस्थितीतून जात असल्यामुळे नवरात्र उत्सव सर्वांनी साधेपणाने, आरोग्यविषयक जनजागृती, रक्तदान, प्लाझ्मा दान तसेच इतर समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करावा असे आवाहन राज्यपालांनी आपल्या संदेशाद्वारे केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!