राज्यपालांची मलबार हिल येथील आदिनाथ जैन मंदिराला भेट


दैनिक स्थैर्य । दि.१८ जानेवारी २०२२ । मुंबई । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मलबार हिल मुंबई येथील शतकाहून अधिक जुन्या बाबू अमीचंद पन्नालाल आदिश्वर जैन मंदिराला भेट देऊन प्रथम तीर्थंकर भगवान श्री ऋषभदेव (आदिनाथ) यांचे दर्शन घेतले.

यावेळी राज्यपालांनी सलग १८० दिवसांच्या उपवासाचा संकल्प केलेल्या जैन संत तपस्वी आचार्य हंसरत्न सुरीश्वरजी महाराज व इतर जैन संतांची सदिच्छा भेट घेतली. आमदार मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!