सरदार तारा सिंग यांना राज्यपालांची श्रद्धांजली


 

स्थैर्य, मुंबई, दि.१९: माजी आमदार सरदार तारा सिंग यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

सरदार तारा सिंग लोकप्रिय नेते व समाजसेवक होते. समाज कार्य तसेच धर्म कार्यात ते नेहमी आघाडीवर असत. राज्य विधानमंडळाचे अनेक वर्षे सदस्य असलेल्या तारा सिंग यांनी जनतेची अथक सेवा केली. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक सच्चा लोकसेवक गमावला आहे. दिवंगत आत्म्याच्या स्मृतींना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो तसेच आपल्या शोकसंवेदना त्यांच्या परिवारास कळवितो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!