दैनिक स्थैर्य । दि. ११ डिसेंबर २०२२ । मुंबई । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचनाताई चव्हाण यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
वैशिष्ट्यपूर्ण आवाज व ठसकेबाज शब्दफेकीमुळे सुलोचनाताईंनी अनेक लावण्या व गीते अजरामर केली. त्यांचा स्वर वर्षानुवर्षे लोकांच्या मनात घोळत राहील यात शंका नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे सुपुत्र विजय चव्हाण व इतर कुटुंबियांना कळवतो असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.