राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील ३५ उदयोन्मुख तारे सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ७ मे २०२२ । मुंबई । देशामुळे आपण प्रगती करतो तसेच आपल्या योगदानामुळे देश प्रगती करतो. आपण करीत असलेले कार्य देशासाठी करीत आहोत आणि आपण करीत असलेली सेवा ही ईश्वराने दिलेली संधी आहे असे मानून कार्य केले तर त्या कामातून आनंदही  मिळतो व काम अधिक चांगले होते असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील ३५ उदयोन्मुख व्यक्तींना मंगळवारी (दि. ३) राजभवन येथे ‘कमला रायझिंग स्टार्स’ पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. अंकीबाई घमंडीराम गोवानी ट्रस्टतर्फे हे पुरस्कार देण्यात आले.

अभिनेत्री प्राजक्ता माळी, नृत्य दिग्दर्शक धर्मेश येलांडे, अभिनेते प्रतीक गांधी, युवा गायक अमित त्रिवेदी, पत्रकार फेय डिसूझा,फॅशन डिझायनर दिव्या शेठ आदींना ‘कमला रायझिंग स्टार्स’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत युवक युवतींना सन्मानित केल्याबद्दल राज्यपालांनी गोवानी ट्रस्टचे अभिनंदन केले व सर्व पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. ट्रस्टचे संस्थापक रमेश गोवानी व निदर्शना गोवानी यावेळी उपस्थित होते.

प्रसिद्ध डॉक्टर प्रतित समदानी, गायिका अनन्या बिर्ला, शेफ रणवीर ब्रार, कलाकार डीजे शान, अभिनेते राहुल शेट्टी, मानव मंगलानी, विशाल अग्रवाल, रोनक, नदी संरक्षण कार्यकर्ते ग्यात्सो लेपचा, मुक्ती मोहन, रिद बर्मन, निधी भाटिया, डॉ. जितेंद्र पंड्या, अभिनेते आकाश ठोसर, वंदना जगवानी, टी. कोशी, दीक्षांत मेहरा, शौर्य मेहता, अनुजा झवेरी, करण कुंद्रा, मानसी बागला, डॉ. मीनाक्षी मंदा, एकता संधीर, लक्ष्मी गोवेकर, सौरभ चॅटर्जी, रुग्वेद बारगुजे, पृथ्वीराज पाटील, अपेक्षा दीक्षित, विनायक प्रभू यांना देखील कमला रायझिंग स्टार पुरस्कार देण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!