
दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२२ । सातारा । डॉ. भावेश भाटिया यांच्या मोळेश्वर ता. महाबळेश्वर येथील सनराईज कँडल्स आणि वॅक्स म्युझियमला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली.
योवळी उपजिल्हाधिकारी संगिता चौगुले, तहसिलदार सुषमा पाटील, डॉ. भावेश भाटिया, निता भाटिया, राजन ढेबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
वॅक्स म्युझियममध्ये मेणापासून तयार करण्यात आलेल्या आकर्षिक व सुवासिक मेणबत्त्या, हस्तकला वस्तू यांची पहाणी करुन तेथे काम करणाऱ्या दिव्यांगांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांचे कौतुक केले.