राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२२ । पुणे । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला भेट दिली. त्यांनी भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या समाधी स्थळाला अभिवादन केले आणि महर्षी कर्वे  स्मारकालाही भेट दिली.

राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी संस्थेच्या परिसराची पाहणी करताना प्रथम संस्थेचे वास्तुरचना महाविद्यालय, ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत चालविली जात असलेली संपदा बेकरी आणि संस्थेची प्रथम वास्तू असलेली ‘कर्वे यांची झोपडी’ या ठिकाणी भेट देऊन माहिती जाणून घेतली. त्यांनी कर्वे शिक्षण संस्था परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले व संस्थेस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास, उपाध्यक्ष सागर ढोले पाटील, कार्याध्यक्ष रवींद्र देव, उपकार्याध्यक्षा विद्या कुलकर्णी, आजन्म सेवक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधुरी खांबेटे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!