ब्राह्मण समाजाच्या महामंडळाबाबत राज्य सरकारला निर्देश देणार – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.३१: ब्राह्मण समाजाच्या महामंडळाबाबत राज्य सरकारला निर्देश देणार असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुंबईतील राजभवनात समस्त ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असता वचन दिले आहे.

यावेळी समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाबाबात चर्चा केली असता राज्यपालांनी राज्य सरकारला सकारात्मक निर्देश देण्याचे वचन दिले. तसेच ब्रम्ह महा शिखर परिषदेचे प्रवक्ते विश्वजीत देशपांडे यांनी ब्राह्मण समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या व त्यांच्या ग्रामीण भागातील अडचणी मांडल्या. तर मकरंद कुलकर्णी यांनी राज्य सरकार सोबत आजमितीस झालेला पत्रव्यवहार व आजची स्थिती कथन केली. त्याच बरोबर संजीवनी पांडे यानी ब्राह्मण समाजातील महिला त्यांची आर्थिक व शैक्षणिक स्थिती बाबत अडचणी कथन केली. तसेच ॲड. आरती सदावर्ते – पुरंदरे यांनी ब्राह्मण समाजावर होणाऱ्या लिखाणावर बंदी घालावी व ब्राह्मण समाजाच्या संरक्षणासाठी कडक कायदे करावे असे ही त्या म्हणाले.

दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सगळ्या अडचणी ऐकून घेऊन तसेच सकारात्मक चर्चा करून राज्य सरकारला निर्देश देण्याचे अभिवचन दिले. या शिष्टमंडळात ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा. काकासाहेब कुलकर्णी, ब्रम्ह महा शिखर परिषदेचे प्रवक्ते विश्वजीत देशपांड, मकरंद कुलकर्णी, संजीवनी पांड, ॲड. आरती सदावर्ते – पुरंदरे हे उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!