सरकारची मोठी घोषणा, कोरोना मॉड्यूल अ‍ॅप बनवा आणि जिंका 1 कोटी रुपये

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२४: कोरोना विषाणूवरील लशीबाबत जगभरातून चांगल्या
बातम्या येत असतानाच केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. माहिती आणि
तंत्रज्ञान मंत्रालयाबरोबर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना
लशीचे वितरण आणि त्याची नेटवर्क यंत्रणा मजबूत करण्यासाठी ‘CoWIN’ लाँच
करण्याची घोषणा केली आहे. याचा डिजीटल प्लॅटफॉर्मवर वापर केला जाणार आहे. 

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद याबाबत म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावर
कोविड लशीच्या वितरण प्रणालीसाठीचे तंत्र प्रभावीरित्या तयार केले जाणार
आहे. भारतातील इनोव्हेटर्सने कोरोनाविरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका पार
पाडलेली आहे. मी भारतभरात कोरोना लशीकरणाच्या अभियानाबाहेर महत्त्वपूर्ण
भूमिकेसाठी CoWIN मंच मजबूत करण्यासाठी इनोव्हेटर्स आणि स्टार्टअप्सला
आमंत्रित करतो. यासाठी 23 डिसेंबरपासून https://meitystartuphub.in नोंदणीकरणाची प्रक्रिया सुरु झाली आहे. यात सहभागी होण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज करु शकता. 

यासाठी पहिल्या 5 अर्जदारांना कोविन एपीआय
(अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) प्रदान केले जाईल. निवडलेल्या प्रत्येक
अर्जदाराला दोन लाख रुपये जिंकण्याची संधी मिळेल. याचा वापर ते आपल्या
लॉजिस्टिकशी निगडीत गरजा पूर्ण करु शकतील. या स्पर्धेत आघाडीच्या 2
स्पर्धकांना 40 लाख आणि 20 लाख रुपये दिले जातील. 

CoWIN अ‍ॅपमध्ये पाच मॉड्यूल आहेत. यामध्ये
प्रशासनिक मॉड्यूल, दुसरा रजिस्ट्रेशन मॉड्यूल, तिसरा व्हॅक्सिनेशन
मॉड्यूल, चौथा लाभान्वित स्वीकृती मॉड्यूल आणि पाचवा रिपोर्ट मॉड्यूलचा
समावेश आहे. यामध्ये पहिला मॉड्यूल प्रशासनिक मॉड्यूल आहे. यामध्ये लशीसाठी
वेळ निश्चित करणे आणि लशीकरण केल्या जाणाऱ्या लोकांना आणि व्यवस्थापनाला
नोटिफिकेशन पाठवले जाईल. रजिस्ट्रेशन मॉड्यूलमध्ये तुम्ही स्वतः लशीसाठी
रजिस्ट्रेशन करु शकाल. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!