
स्थैर्य, पाटण, दि. 25 : पाटण तालुक्यातील तळमावले येथील कोरोना केअर सेंटरला सलग दोन दिवस भेट देऊन सर्व क्वारंटाईन लोकांची माहिती घेतली असता तेथे सुविधा दिल्या जात नाहीत. स्वच्छता ठेवली जात नाही. त्यामुळे आता यामध्ये शासनाने लक्ष घालावे, अशी मागणी भाजपच्या जिल्हा महिला अध्यक्ष कविता कचरे यांनी केली आहे.
कविता कचरे यांनी तळमावले येथील कोरोना केअर सेंटरला सलग दोन दिवस भेट देऊन तेथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. लोकांना काही पाहिजे नको याची चौकशी करून सरपंच, उपसरपंच यांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी विनंती केली. तलाठी सर्वांसी बोलून समन्वय साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
सध्या येथे 71 लोक क्वारंटाईन आहेत अजूनही संख्या वाढते आहे. लोकांना सुविधा मिळत नाहीत. लहान मुलांना दूध नाही. लोकांना दुपारचा चहा नाही, शुद्ध पाणी नाही, पाण्याचा वास घाण येतोय . बाथरूम संडास तुंबले आहेत तेव्हा शासनाने वेळीच लक्ष देऊन, या समस्या दूर कराव्यात, अशी मागणी कविता कचरे यांनी केली आहे.