दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । “मातंग समाजाचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून शासन मातंग समाजाच्या पाठिशी आहे”, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
मुंबईत आझाद मैदान येथे मातंग समाजाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या वतीने मंत्री श्री. देसाई यावेळी उपस्थित होते. आमदार नरेंद्र बोंडेकर तसेच मातंग समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
त्यांनी दिलेले निवेदन मंत्री श्री. देसाई यांनी स्वीकारले व मातंग समाजाच्या विविध समस्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी आश्वस्त केले.