दैनिक स्थैर्य । दि. ०४ जुलै २०२२ । सातारा । धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे बहुल्य असलेल्या राज्यातील शासनमान्य शैक्षणिक संस्थांना पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देऊन शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी शासनमान्य शाळांना पायाभूत सोईसुविधा निर्माण करण्यासाठी राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित /विना अनुदानित / कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व दिव्यांग शाळामध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन २०२२-२३ राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव शाळांनी दिनांक 31 जुलै 2022 पर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे सादर करावा असे, जिल्हा नियोजन अधिकारी य. वि. थोरात यांनी कळविले आहे.