दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२३ । सातारा । सातारा जिल्ह्यात 2023-2024 मध्ये सुधारीत गोवर्धन गोवंश सेवाकेंद्र ही योजना राबविण्यात येणार असून इच्छुकांनी 19 जुलै 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विजय सावंत यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत वाई वगळता सर्व तालुक्यामधून एका गोशाळेस शासनाचे अनुदान देण्यात येणार आहे. गोशाळेकडे सांभाळ करण्यात येत असणारे पशुधन विचारात घेवून एकवेळचे अनुदान 15 लाख ते 25 लाख च्या मर्यादेत देय असणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याचे पंचायत समिती कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे संपर्क साधावा.