कुशाग्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान, मुंबईची सिया कोठारी ठरली मानकरी
स्थैर्य, मुंबई, २३ : ८ वी ते १२ वी वर्गांसाठी भारतातील लाइव्ह ऑनलाइन स्कूल प्रिपरेशन अॅप असलेले गोप्रेप हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमविषयक गरजा भागवते. यात जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांचाही यात समावेश असून गोप्रेपने नुकताच, गोप्रेप टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (जीटीएसई)चा निकाल जाहीर केला. यात मुंबईतील डी.जी.खेतान इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी सिया अभय कोठारी हिने सातवा क्रमांक पटकावला आहे. तिला १०० टक्के स्कॉलरशिप आणि विशेष पारितोषिक म्हणून फोन मिळाला आहे.
ही राष्ट्रीय पातळीवरील स्कॉलरशिपसाठीची पात्रता परीक्षा भारतातील सुपर १००० च्या शोधात घेण्यात आली. सुरक्षा आणि सुलभतेसाठी विद्यार्थ्यांच्या घरूनच १००० जणांची परीक्षा घेण्यात आली. ही दोन टप्प्यातील परीक्षा जवळपास १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांनी जीटीएसईचा दुसरा टप्पा पार केला, त्यांना राष्ट्रीय पातळीवरील १ कोटी रुपयांची स्कॉलरशिप गोप्रेपकडून मिळाली. होंडा अॅक्टिव्हा, वन प्लस स्मार्टफखोन्स, लॅपटॉप, कॅसिओ वॉचेस, अॅमेझॉन गिफ्ट ही विशेष पारितोषिके ४० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली. गोप्रेपने वंचित कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी अतिरिक्त शिष्यवृत्तीची ऑफर दिली.
गोप्रेपचे संस्थापक विभू भूषण म्हणाले, “ जीटीएसई मागील अतिरिक्त हेतू म्हणजे भारतातील १००० सर्वाग कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी शोधणे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला आधार देणे. विद्यार्थ्यांसाठी ही एकूणच उत्कृष्टतेची चाचणी होती. देशभरात व्यापक स्तरावर विद्यार्थ्यांनी उच्च प्रतीचे शैक्षणिक कौशल्य दर्शवले.”