गोपीचंद पडळकरांना साताऱ्यात फिरकू देणार नाही : तेजस शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २४ : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी पडळकरांचा निषेध व्यक्त केला आहे. तसंच आ.गोपीचंद पडळकर यांना भविष्यात सातारा जिल्ह्यात फिरकू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी दिला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखं आहे. केवळ प्रसिद्धीच्या वर्तुळात राहण्याचा हा असहाय्य प्रयत्न आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्यांची. जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो. असे अनेक गोपीचंद महाराष्ट्रात झाले आहेत. पवारांच्या उंचीलाही ते स्पर्श करु शकत नाहीत. शरद पवारांवर बोलताना जी भाषा वापरली आहे त्याचा आम्ही सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवकच्या वतीने तीव्र निषेध करतो. तसचं त्यांना भविष्यात सातारा जिल्ह्यात फिरकू देणार नसल्याचा इशारा तेजस शिंदे यांनी दीला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!