गोपाळदास शेठ यांचे निधन


स्थैर्य, सातारा, दि. 28 ऑगस्ट : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक, भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते, सातारा जिल्हा व्यापारी महासंघांचे माजी अध्यक्ष गोपाळदास रामदास शेठ (वय 76) यांचे अल्प आजाराने निधन झाले. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते कट्टर स्वयंसेवक होते. त्यांना अनेक संघ प्रचारकांचा सहवास लाभला होता.

आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून त्यांनी 15 महिने काम केले. त्यावेळच्या कठीण काळात त्यांनी पक्ष वाढीसाठी व संघटनासाठी काम केले. कै. रामभाऊ म्हाळगी, कै. अण्णा जोशी, जयवंती बेन मेहता, कै. हशू अडवाणी, रामभाऊ नाईक, कै. उत्तमराव पाटील, कै. प्रमोद महाजन, कै. गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध होते. धडाडीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. दि सातारा मर्चन्ट को ऑपेरेटीव्ह बँकेचे ते संस्थांपक अध्यक्ष होते. तसेच गुजराथी अर्बन पतसंस्थेचे ते संचालक होते. विमा विक्री प्रतिनिधी यतीन शेठ व गौरव शेठ यांचे ते वडील होत. तसेच शेअर ब्रोकर रवी शेठ, उद्योजक भरत शेठ, पंचपाळी हौद दुर्गा माता मंडळाचे उपाध्यक्ष हरेश शेठ यांचे ते काका होत. त्यांच्या अंत्ययात्रेस राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!