गोपैसाद्वारे ‘अर्नली’ या नवीन डील शेअरिंग प्लॅटफॉर्मची घोषणा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ८ जुलै २०२१ । मुंबई। गोपैसा ह्या भारतातील सर्वोत्तम कॅशबॅक आणि कूपन्स वेबसाईटने आज अर्नली ह्या आपल्या डील शेअरिंग प्लॅटफॉर्मची घोषणा कली. लोकांना सोप्या व नियमित उत्पन्नाच्या स्रोताला प्राप्त करण्यात सहाय्य करणे, हे ह्या प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट आहे. ह्या नवीन प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थी, गृहिणी, काम करणारे व्यावसायिक, ब्लॉगर्स, प्रभावशाली लोक असे युजर्स प्रति महिना रू. ३०,००० इतक्या रकमेपर्यंत अतिरिक्त उत्पन्न कमावू शकतात आणि वास्तविक रोख रक्कम प्राप्त करू शकतात.

८ वर्षांपासून अधिक काळ भारतीय कॅशबॅक आणि कूपन्स उद्योगामध्ये सेवा दिल्यानंतर गोपैसाने युजर्सना अतिरिक्त उत्पन्न देण्यासाठी सहाय्य करणा-या युजर फ्रेंडली अशा माध्यमासाठी असलेली संधी ओळखली. ह्या ब्रँडने लक्षात घेतले की, संलग्न मार्केटिंगसाठी सखोल जोडण्याचे उत्तम ज्ञान असले पाहिजे, सब आयडी ट्रॅकिंग व इतर गोष्टी असल्या पाहिजेत. कोणत्याही ऑनलाईन रिटेलरसाठी विशेष बनवलेल्या डील्स शेअर करून अतिरिक्त पैसे कमावण्याची इच्छा असलेल्या युजर्ससाठी अर्नलीने ह्या सर्व आव्हानांवर मात करून एक वापरण्यास सहज असा प्लॅटफॉर्म आणला आहे.

उत्पन्न लिंक निर्मिती करणा-या प्लॅटफॉर्ममध्ये आघाडीच्या ब्रँडसना प्रमोट करून व ब्रँडसद्वारे देण्यात येणा-या आकर्षक उत्पन्न दरांसह मोफत विशिष्ट इन्कम लिंक्स बनवून कोणालाही पैसे कमावता येऊ शकतात. त्यांच्या नेटवर्कमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ह्या लिंक्स शेअर करूनही युजर आणखी पैसे कमवू शकतो. शून्य गुंतवणूक, मान्यतेसाठी आघाडीच्या रिटेलर्सकडून थेट मान्यता, सुमारे ३० टक्के कमिशन इ. अनेक लाभ युजर्सना देऊन अर्नलीने स्वत:चे विशिष्ट स्थान निर्माण केले आहे.

गोपैसा आणि अर्नलीच्या सह- संस्थापिका सौ. अंकिता जैन यांनी सांगितले की, “कोरोना व्हायरसमुळे आलेल्या विविध निर्बंधांमुळे अनेक लोक खूप वेळ ऑनलाईन व्यतित करत आहेत. असे करताना काही लोकांना पैसे कमवण्याचे नवीन पर्यायही शोधायचे आहेत कारण ते सध्या महामारीच्या बिकट काळातून मार्ग काढत आहेत. त्यामुळे आमच्या लक्षात आले की, अर्नलीसारख्या प्लॅटफॉर्मची आत्ताची गरज पूर्वीपेक्षाही खूप जास्त आहे. तसेच, ई- कॉमर्स मार्केटमध्ये असलेली बूम लक्षात घेता हे सर्व एकत्र आले तर त्यामुळे लक्षावधी युजर्ससाठी खूप मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होऊ शकतात.”


Back to top button
Don`t copy text!