दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांनी नुकतीच सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अपशिंगे (मि.) (ता. सातारा) गावाला सदिच्छा भेट दिली. बोरगाव पोलीस ठाण्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी ही सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी येथील विजयस्तंभाला भेट देऊन आदरांजली वाहिली. तसेच येथे बसविण्यात येणाऱ्या राणगाड्याच्या स्थळालाही भेट दिली. यावेळी येथील ग्रामस्थांचे त्यांनी कौतुकही केले. यावेळी बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव सोबत होते. ग्रामस्थांच्या वतीने यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस हवालदार विजय साळुंखे, प्रकाश वाघ, दिनेश निकम (आबु), दादासो पवार, तुषार निकम, संजय आप्पा, किशोर मोरे, पांडुरंग निकम, अजित निकम, गणेश पैलवान व ग्रामस्थ उपस्थित होते.