दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या विरोधात सातारा जिल्हा पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे सातारा जिल्ह्यात बोरगाव लोणंद व कराड तालुका येथे तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 2690 रुपयांचा माल जप्त केला आहे.
सासपडे तालुका सातारा येथे योगेश दिलीप अवघडे राहणार लक्ष्मी नगर बेघर वस्ती याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून 910 रुपये किमतीच्या देशी दारूच्या 13 बाटल्या जप्त करण्यात आले आहेत तसेच लोणंद तालुका खंडाळा येथे अरुण भंडारी यांच्या देशी दारू दुकानाच्या आडोशाला अर्जुन उजण्या पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून आठशे रुपये किमतीचे आठशे रुपये किमतीची दहा लिटर ताडी व पाच लिटरचे दोन कॅन जप्त करण्यात आले आहेत कराड तालुक्यात म्हासोली येथे शिवार नावाच्या हॉटेल पाठीमागे पांडुरंग दत्तू शिरतोडे याला कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून 980 रुपये किमतीच्या पंधरा बाटल्या जप्त करण्यात आले आहेत सदर मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून संबंधितांवर पीसीआर 41 प्रमाणे नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आली आहे.