गोखळी येथील हार्डवेअर दुकानातून 49 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 30 नोव्हेंबर 2024 । फलटण । गोखळी (ता.फलटण) येथील दोन वेगवेगळ्या हार्डवेअर दुकानातून वेगवेगळ्या प्रकारचा एकूण 49 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि.27/11/2024 रोजी रात्री 8:30 ते दि. 28/1/2024 रोजी सकाळी 6:00 या कालावधीत मौजे गोखळी (ता.फलटण) येथे फिर्यादी उदयसिंह आत्माराम घाडगे (वय 62), रा.गोखळी यांच्या मालकीच्या आकाश हार्डवेअर या पत्राशेडमध्ये असलेल्या दुकानाचे पाठीमागील बाजूचा पत्रा कापून रुपये 19 हजार किंमतीचे साहित्याची चोरी झाली आहे. यामध्ये रु.2 हजार अंदाजे किंमतीच्या कोठारी कंपनीच्या रबरी पाईप तीन बंडल, रु. 15 हजार अंदाजे किंमतीचे पीव्हीसी फिटींग मटेरियलच्या सात पिशव्या, रु. 1 हजार अंदाजे किंमतीचे सात चौदा मापाची कॉपर वायर बंडल, रु. 1 हजार अंदाजे किंमतीची शितल कंपनीची 20 कुलपे अशा साहित्याचा समावेश आहे.

दुसर्‍या एका घटनेत शुभम बाळासाहेब गावडे यांच्या सर्वेश हार्डवेअर पत्रा शेड दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करुन 30 हजार 500 रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी पळवले आहे. यामध्ये अंदाजे रु. 15 हजार किंमतीचे सात बावन्न मापाची कॉपर वायर बंडळ सात, अंदाजे रु. 7 हजार 500 किंमतीचे 15 किलो डीपी कॉपर तार, अंदाजे रु. 2 हजार किंमतीचे कोठारी कंपनीची रबरी पाईप तीन बंडल, अंदाजे रु. 1 हजार किंमतीचे वेल्डींग कटींगचे ग्रॅन्डर, अंदाजे रु. 2 हजार किंमतीचे पक्कड, स्क्रू ड्रायव्हरचे बॉक्स, अंदाजे रु. 2 हजार किंमतीचे दोन फरशी कटींग मशीन, अंदाजे रु. 1 हजार किंमतीचे अ‍ॅडजेस्टेबल पाना या साहित्याचा समावेश आहे.

सदर चोरीप्रकरणी अज्ञाताविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार ओंबासे हे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!