जून 2020 महिन्यातले वस्तू आणि सेवा कर महसूल संकलन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जून महिन्यात 90,917 कोटी रुपये सकल वस्तू आणि सेवा कर महसूल संकलन

स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 02 : जून 2020 मधे 90,917 कोटी रुपये सकल वस्तू आणि सेवा कर महसूल संकलन झाले. यामध्ये ‘सीजीएसटी’ 18,980 कोटी रुपये, ‘एसजीएसटी’ 23,970 कोटी रुपये, ‘आयजीएसटी’ 40,302 कोटी रुपये (आयात मालावरच्या 15,709 कोटी रुपयांसह) आणि ‘सेस’ 7,665 कोटी रुपये (आयात मालावरच्या 607 कोटी रुपयांसह) यांचा समावेश आहे.

सरकारने नियमित भरपाई स्वरुपात आयजीएसटीमधून 13,325 कोटी रुपये ‘सीजीएसटी’साठी, तर 11,117 कोटी रुपये ‘आयजीएसटी’साठी भरपाई स्वरुपात दिले. ही भरपाई दिल्यानंतर जून 2020 मधे केंद्र आणि राज्य सरकारचे ‘सीजीएसटी’ एकूण महसूल संकलन 32,305 कोटी रुपये तर ‘एसजीएसटी’ महसूल संकलन 35,087 कोटी रुपये राहिले.

हे संकलन गेल्या वर्षीच्या याच महिन्यातल्या वस्तू आणि सेवा कर संकलनाच्या 91% राहिले. या महिन्यात आयात मालावरचा महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यातल्या या महसुलाच्या  71%, तर या महिन्यात देशांतर्गत व्यवहारातून महसूल (सेवा आयातीसह) गेल्या वर्षीच्या याच महिन्यातल्या या महसुलाच्या 97% होता. वस्तू आणि सेवा कर विवरणपत्रे भरण्यासाठी सरकारने वाढीव मुदत दिल्याने जून महिन्यात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचीही काही विवरणपत्र दाखल झाली आहेत. जून 2020 दाखल होणारी मे महिन्याची काही विवरणपत्रे जुलैच्या पहिल्या काही दिवसात दाखल केली जातील.

कोविड महामारी मुळे झालेला अर्थ व्यवस्थेवरचा परिणाम व महामारीमुळे विवरण पत्रे भरण्यासाठी, तसेच कर भरणा करण्यासाठी सरकारने दिलेली सवलत यामुळे वित्तीय वर्षातल्या महसुलावर कोविड-19 चा परिणाम होत आहे. मात्र गेल्या तीन महिन्यातली आकडेवारी पाहता वस्तू आणि सेवा कर महसूलात सुधारणा दिसत आहे. एप्रिल महिन्यात वस्तू आणि सेवा कर महसूल 32,294 कोटी रुपये होता, गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या महसूलाच्या 28% हा महसूल आहे. मे महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन 62,009 कोटी रुपये होते. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या महसूलाच्या 62% हा महसूल आहे. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, वस्तू आणि सेवा कर संकलन, गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या महसूल संकलनाच्या 59% होते. मे 2020 या महिन्यासाठी अनेक करदात्यांना अद्यापही आपले विवरण पत्र दाखल करण्यासाठी मुदत आहे.

चालू वर्षातल्या मासिक सकल वस्तू आणि सेवा कर महसूल विषयक कल तक्त्यात दर्शवण्यात आले आहेत. तर आणखी एका तक्त्यात जून 2020 महिन्यातल्या राज्यनिहाय वस्तू आणि सेवा कर संकलनाची 2019 मधल्या जून आणि संपूर्ण वर्षाशी तुलना दर्शवण्यात आली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!