गुड थॉट्स : सुप्रभात…..आज १३ फेब्रुवारी… कर्तृत्व हेच नेतृत्व

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


एकदा कर्तृत्व सिद्ध झाल की, संशयान उठणाऱ्या नजरा सुद्धा आदरानं झुकतात.आपण उंचावर जात असताना अनेक अडचणीचा चढ चढावा लागतो.असंख्य अडथळे उभी रहातात.त्यावेळी आपण ठरवलेली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कंबर कसून झपाटून कार्यरत झाल्यास फलनिष्पत्ती होणारच.

माणसं चालू देत नाहीत अन् बसून ही देत नाहीत. त्यावेळी ऐकावे जनाचे करावे मनाचे या वृत्तीने प्रेरीत होऊन राहिल्यास इच्छित मनोरथ सफल होणार.मानवी प्रवृत्ती सत्कर्मात विघ्न निर्माण करतात.त्यावेळी खचून न जाता आपल्या जीवनव्रतेशी एकरुप होणे.विघ्नसंतोषी त्यांचे काम वेळ देऊन जर चिकाटीने करीत असतील तर त्यांच्या सातत्याला प्रणाम करुन ,तीच प्रेरणा घेऊन आपण आपल्या कार्य निश्चिती कडे दमदार वाटचाल करणे.अन्यथा आपण थांबल्यास त्यांच्या प्रवृत्तीला वावच मिळणार.

एक मात्र त्रिकालबाधित सत्य आहे की आपण आपले कर्तव्य सिद्ध केल्यास तेच लोक जयजयकार करणार.आणि ते सा-याला ओरडून सांगणार मी म्हणत नव्हतो का,हा माणूस कर्तृत्व करुन दावणार.फक्त हे ऐकण्यासाठी ध्येयापासून विचलीत न होता.आपली सारी कर्तव्य पार पाडून वाटचाल केल्यास यशाच्या शिखरावर पोहचण्यास वेळ लागणार नाही.

कर्तृत्व नेतृत्व दातृत्व आपोआप मिळत नाही.कमवावे लागते

आपलाच कर्तव्यनिष्ठ प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!