आपण रस्त्याने घराकडं निघालो आहे. एवढ्यात आपल्या समोर अपघात झाला. तर नुसती बघ्यांची गर्दी अन् मोकार वायफळ चर्चा. छेडछाडी, गुंडागर्दी, चोरीमारी, भ्रष्टाचार, दहशत इत्यादी प्रकारात आपली भूमिका कोणती ? नको आपल भलं अन् घर भलं, पोलिस ससेमिरा, गुंडाचा नाहक त्रास, आपल्या काय पडलं. यातूनच आजचा समाज जात आहे.
तसे पाहिले तर आपण मध्यमवर्गीय चाकोरीबद्ध जीवन जगत असतो. नुसत्या उचापती सांगितल्या कुणी ? तुम्हाला तेवढंच पडलंय, समाजसेवक व चमकेगिरी नुसती फुकटचं झंझट. आपण समजून घेऊ या. कुणीच कुणांच्या फंद्यात पडायच नाही. तर ही समाजव्यवस्था टिकेल का ? आपण थोडं पुढं होऊन सामोरे गेल्यास अनेक मार्ग निघून कामे मार्गी लागतात.
नेहमी लक्ष्यात असू द्या की, माणसं बाभळीच्या नव्हे तर आंब्याच्या वृक्षाला दगड मारतात. म्हणून आंब्याने बहरणे सोडलं का. आपण सुद्धा बघ्याची भूमिका न घेता सामोरे गेल्यास काही प्रमाणात तरास होईल. पण त्यातून मिळणारे मानसिक समाधान व दुवा यासारखे सुख कोणते. चला तर येथून पुढं नुसतं बघण्यापरीस सामोरे जाण्याच बळ वाढवू या.