वैज्ञानिक प्रगतीने मानवी जीवनात चुटकीसरशी बसल्या जागेवर जगाच्या कानाकोप-यातील माहिती होती.ही प्रगती संशोधक ,शास्त्रज्ञ यांच्या अथक परिश्रमाचे फलित आहे.चंद्रावर पाऊल,सागरी तळाशी संशोधन,मंगळ यान,अवकाश भरारी,अनेकविध शोध मोहिमा यातून भारतीय संशोधकांचा अभिमान आहे.
अध्यात्म व विज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.अध्यात्मातून विज्ञान व विशेष ज्ञानाच्या जोरावर शोधक वृत्ती सुरु होऊन नवनविन प्रयोग लावण्यात यश आले. विज्ञानाच्या प्रगतीने मानवी जीवन भौतिक साधनांने सुसाह्य झाले.पण आत्मीक सुखाचा दुरावले. विज्ञानाचे दुष्परिणाम ही आहेत.निसर्गाच्या अदृश्य शक्तीपुढे विज्ञान थिटे पडत आहे. कोविड १९ विषाणू मानव की नैसर्गिक निर्मिती हा वादातीत प्रश्न असून लशीबाबतीत संभ्रमावस्था ही वैज्ञानिक मर्यादा स्पष्ट करते.वैज्ञानिक वापर मानवी जीवन विध्वंस करण्यापरीस विधायक बाबतीत असावा.वैद्यकीय क्षेत्रातील वैज्ञानिक प्रगती थक्क करणारी आहे,दुर्बीणी शस्त्रक्रिया ,सोनोग्राफी,गुंतागुंतीची शरीर रचनेतील निदान,कृषी क्षेत्रातील एकाच वृक्षाच्या फांद्यावर वेगवेगळी फळे,प्रसार माध्यमे व विधुत उपकरणे यातील नवनविन तंत्रज्ञान ,दळणवळण सुलभ सोई या सुविधेने जग हाकेच्या जवळ आले. वैज्ञानिक प्रगतीने जवळचा संपर्क तुटला अन् अभासी दुनियेत मनुष्य गुरफटला. वैद्यकीय क्षेत्रातील गर्भलिंग निदान चाचण्या,विषारी व वाढते अजार वाढणारी महागाडी औषधे ,कृषीत तणनाशक ते रात्रीत फळे पिकवणारी रासायनिक तंत्रे ,औद्योगिक प्रदुषण,जल,वायू,ध्वनी यांचे वाढते प्राबल्य पाहिल्यास विज्ञान तारक की मारक.
मला वाटते की,सूरा हातात आईच्या कांदा कापणार,डॉक्टर चिरफाड करणार,माथेफिरु गळ्याला लावणार. दोष तंत्रज्ञानाचा नाही. वापरणा-याचा आहे.
तंत्रज्ञान वापर योग्य हेच वैज्ञानिक शहाणपण
आपलाच विज्ञानवादी प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१