कणखर देशा,राकट देशा,दगडाच्या देशा,महाराष्ट्र देशा यातूनच आपल्या राज्याची व भाषेची ओळख आहे.आपली मातृभाषा व राजभाषा मराठी(म-हाटी) आहे.अ मुळाक्षारांपासून सुरु होणारी व ज्ञ पर्यंतचा प्रवास म्हणजे अ-अज्ञान कडून ज्ञ-ज्ञानाकडी नेणारी भाषा मराठी हीचा अभिमान व स्वाभिमान आहे.स्वर ,व्यंजन,वाक्यप्रचार ,समास,अलंकार,संधी,म्हणी,सुभाषिते,सुविचार इत्यादी वैभवाने नटलेली भाषासौष्ठव आहे.
मराठी शिकून काय उपयोग ?असा सध्या समाज्यात सूर ऐकू येतो.देश भ्रमंती व चाकोरीबद्ध नोकरीसाठी इंग्रजी अन् स्वयंपूर्ण होण्यासाठी मायबोली मराठी आवश्यक आहे.वक्त्तृत्व , सूत्रसंचलन,कीर्तन ,प्रवचन,भारुड,पोवाडे,लावणी,विविध लोककला,लोकगीते,लोकनाट्य ,नाटके,वृत्तवाहिन्या ,निवेदन,रेडिओ जॕकी,मालिका ,चित्रपट ,एकपात्री,एकांकिका,कथाकथन,आख्याने,ओवी गायन,काव्य गायन,भजन,गवळणी इत्यादी मराठी भाषेतील प्रकार व्यवस्थित हातळल्यास निश्चितच नोकरीच्या पाठीमागे न लागता मराठीतून रोजगार उपलब्ध होऊन सन्मानाने जगता येईल.
मराठीतून विविध साहित्य प्रकाराचे लेखन केल्यास जगाच्या कानाकोप-यातून आपले नाव उंचावेल.मराठी ही जगण्याची भाषा आहे.हे प्रशालेत रुजवणे गरजेचे आहे. मातृभाषा शिक्षण हेच उच्च स्तरावर पोहचवते. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण पाया मजबूतीकरणाचा पाया आहे.मराठीत बोला,लिहिते व्हा,व्यक्त व्हा,स्वाक्षरी करा.शासनस्तरावर सर्व कार्यालयात मराठी व्यवहार भाषा आवश्यक आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज)यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.त्यांचे साहित्य योगदान व कार्य भावी पिढीला सांगावे.
बोली हे मराठी भाषेला लाभलेले वैभव आहे.बोलीचे अध्ययन करून भाषासंशोधक बनता येते.तसेच संतसाहित्य हे भाषेचे वैभवशाली भंडार आहे.त्यातून जगण्यासाठी एक ओवी पुरेशी आहे.
जोपर्यंत ठेच लागल्यावर तोंडातून आई हा शब्द येतो. तोपर्यंत मायमराठी टिकणारच
आपलाच मायबोलीकार प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१