आपल्या मायबोलीने अफाट म्हणीचा खजिना देऊन शब्दार्थ भावार्थ लक्ष्यार्थ यातून बोध होतो. जुनी जाणती माणसं खरंच आजही काबाडकष्ट करुन उत्साहाने जीवन जगत दिसतात.शारीरिक हालचाल,सकस घरगुती जेवण,शारीरिक मेहनत यामुळे वयोवृद्ध तरण्याला लाजवेल अशी कामगिरी करताना दिसतात.
मानसिक ताणतणाव पासून दूर,हव्यास नाही,तुलना,स्पर्धा यापासून कोसो दूर,एकत्रित कुटुंब ,नात्यागोत्यात जिव्हाळा,प्राप्त परिस्थिती समाधान,वडीलधा-याचा धाक,मानसन्मान यातून म्हातारे (महातारे) चमकून व टिकून आहेत.
नवी तरणी पिढी अकाली शारीरिक व मानसिक वृद्धत्व,बाहेरचे खाणेपिणे,भ्रमध्वनी व प्रसार माध्यामांचा अतिवापर,बदलती जीवनशैली,ताणतणाव,बेभान असूया प्रवृत्ती ,मी पणाचा कळस,धावती वेगवान प्रगती,कुठं थांबावे याचे भान हरवलेली तरुणाई जाड भिंगाचा चष्मा,केस पांढरे,लठ्ठपणा,विविध आजारपण ,कर्जे व व्याज याचे चक्रव्यूह,अपत्यांचे संगोपन व भरसाठ शैक्षणिक शुल्क,शहर व गाव यातील दरी यामुळे अकाली वृद्धत्वाने नवी पिढी खचली आहे.
नव्या जुन्या पिढीतील अंतर ,संवादाचा अभाव, विभक्त कुटुंब ,यांत्रिकपणा,संवेदनाशीलतेचा अभाव ,व्यावहारिकता यामुळे खरंच दोन पिढीतील माणसा माणसांत दुरावा निर्माण होत आहे.
महातारे घरी आसणे हेच वैभव
आपलाच अंतरिक प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१