मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचं नसून तो तमच्या संकटात किती खंबीरपणे पाठीशी उभा राहतो हे महत्वाचे आहे.खंडीभर मित्र असण्यापरीस बोटांवर मोजण्या इतपत असावेत.पण ऐनवेळी खंबीर पणे पाठीशी उभे रहाणारे असावेत.पाठीत खंजीर खुपसणा-या मित्रापेक्षा समोरुन वार करणारा शत्रू परवडला.
मैत्री सहवासात तयार होत नसून विचारांवर घडते.मैत्रीत जात ,पात, धर्म आड येत नाही.ती आकाशा सारखी भव्य दिव्य,सागरा सारखी अथांग ,वा-या सारखी चंचल,पर्वता सारखी स्थिर असते.
मला वाटते मित्र अडचणीत आहे.बोलण्याची वाट न बघता मदतीला धावावे.तो सुखात आहे.सन्मानाने जावे.कृष्ण सुदामा,दुर्योधन कर्ण,राम बिभीषण,कृष्ण द्रौपदी ,विठ्ठल सकल संत,शिवराय मावळे, नलराजा राजहंस(नलदमयंती आख्यान) यांची सारखी कठीण समय येता जो कामास येतो तया मित्र म्हणावे
मैत्री निर्मोही,निरपेक्ष,निस्वार्थी,निहंकारी,निखळ असावी.सध्याच्या काळात चलती का नाम गाडी या उक्ती पुरते स्वार्थी मैत्री वाढत आहे .वेळीच सावध व्हावे.मित्राच्या चांगुलपणाचा गैरफायदा न घेता.या पवित्र नात्यांवरील विश्वास उडणार नाही. याची सर्वांना काळजी घेतल्यास हे वैश्विक मैत्रेय नाते अबाधित राहिल.
मैत्री निभावणे हेच खरं जगणं
आपलाच मित्र प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१