प्रचंड आशावादी, प्रबळ इच्छाशक्ती व सकारात्मक ध्येयाकडे वाटचाल ! आयुष्य म्हणजे काय! एक ज्वलंत जगणं. बायको आणि मुलगी काही वर्षांपूर्वी क्रिसमस ट्री विकत आणायला गेल्या असता रस्ता दुर्घटनांत देवाघरी गेल्या. एक मुलगा मेंदूच्या कॅन्सरने वारला. दुसरा मुलगा अमेरीकेच्या नौदलातून कोकीनची नशा करत होता म्हणून काढला गेला.
स्वत:ला तोंडाचा लकवा झाला होता. आयुष्यांत इतक्या अडचणी असूनही, हा माणूस वयाच्या ७७ व्या वर्षी जगातील सर्वात बलाढ्य देशांचा राष्ट्रपती होतोय. मग आपण हतबल का होतोय ? अमेरिका राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या बद्दलच लिहीतोय. आजची तरुणाई भरकटलेली, निराशावादी, दिशाहीन, व्यसनाधिनता, प्रसार माध्यमात गुरफटलेली दिसताना त्याच्या पुढे असे आदर्श व्यक्तीमत्व उभे केल्यास ख-या अर्थाने भारत महासत्ता होईल.
चला तर मग राष्ट्रपती होता नाही आले तरी, आपण देखील आप – आपल्या क्षेत्रामध्ये सक्रीय राहूयात आणि खूप चांगले आनंदी जीवन जगूयात. आपण आपली मानसिकता बदलून टाकू. नवनविन विचार, कल्पना, ध्येय रुजवून जगण्याचा आनंद घेऊ या. आपल्या अनुभवाचा, ज्ञानाचा समाज्याला फायदा झाला. तर जीवन सार्थकी लागलं.