स्वामी विवेकानंद म्हणतात “माझा देश हा बिन डोक्याचा बाजार आहे, इथे चटणी कोरडी खातील, अन तेल दगडावर ओततील, नारळातील चवदार, पोषक जल गटारीत, अन नदीतील गटारजल पवित्र म्हणुन स्वतः पितील” चादरी दगडावर चढवतील अन माणसाला उघड ठेवतिल. “परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिणारी माणसे जिवंतपणी मेलेली असतात, तर चळवळीत काम करणारी माणसे मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात”.
“लोकांच्या अंगात देवी, भुतंच का येतात शिवाजी महाराज, सम्राट अशोक, सावित्री माता फुले, जिजाऊ, अहिल्या, न्युटन यांच्यासारखे विचारवंत का येत नाहीत ? जेंव्हा विचारवंत अंगात येतील तेंव्हा भारत जगावर राज्य करेल व महासत्ता होईल. आपले विचार पुरोगामी हवेत. त्यासाठी वाचन, संस्कार, नाविन्याचा ध्यास या त्रिसुत्रीचा डोस आवश्यक आहे. तत्त्वज्ञान सांगणे सोपे आहे. पण आचरणात आणणे कठिण काम आहे. कळतंय पण वळले ही पाहिजे. वाणीला कृतीची जोड लाभल्यास जीवन मार्ग सुखकर होईल. सध्या कर्ते सेवक कमी अन् बोलते जास्त. बाकी आपण सूज्ञ अधिक लेखन योग्य नोहे.