
दैनिक स्थैर्य । दि. ०९ जुलै २०२२ । फलटण । वैखरीची विविधतेच सप्तरंगी मनोहरी सृजनचे रुपाच प्रतिक मंजे वाखरीचा चैतन्यमय उत्साहानं धावतच पंढरीत दाखल. पादुका जवळ आरती , तिसरे उभे रिंगण पंढरीच दर्शन . दशमीचा सोहळा जणू मी पणाचा त्याग करायला शिकवतो. मी पामर भारवाही हमाल अशीच परमावस्था दिसून येते.
राहुट्यांची विविध रुपे , पताकाची एकता , तुळशीची शुद्धता , माळेच पावित्र्य , चंदन उटीची कपाळी शोभा , पांढरी वारकरी वेशभूशांची पंढरी. उत्साहच भरतं , चर्यावरील कृतज्ञता , लिनता , दीनता , लोटांगणी लगबग , माऊली माऊलीचा पुकार , तुळशी मंजूळाचा शोभिवंत सुगंधीत माला , वासुदेवाचं दान पावलं. लोखकलेचे अविष्कार यातून पाऊले चालती पंढरीची वाट येथे विसवतात.
आतुरतता आषाढी एकादशी विठूरायाच्या दर्शनाची. माऊली काळजी घ्या. आरोग्य जपा.
सुंदर ते ध्यन / उभे विटेवरी
आपलाच विठूदास प्रा. रवींद्र कोकरे
९४२१२१६८२१