सुप्रभात…..आज ५ जुलै माऊली माळ सरस शिरी (माळशिरस)


दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुलै २०२२ । फलटण । पंढरी समीप आल्याने सावळ्या विठूरायाची भेटीसाठी पाऊले चालती , मुखी हरिनाम , उत्साह आमीप, वारकरी देहभान हरपून नातेपूतेकरांचा निरोप घेऊन माळशिरसकडे वाटचाल.

माळशिरस मंजे भाविक भक्तांची मांदियाळी , वैष्णांवाची भेटी , दोन वरीस माऊली भेट नाही म्हणून जीव कासावीस . सगळं भावमय वातावरणात पालखी सोहळा मांडवे त्रृषी तपसाधनेच्या सानिध्यात विसवणार. मांडवे नदीचा प्रवाह , भाविक व वारकरी रिघ , भरुन आलेलं नभ  , शेतीमातीची आस अन् सावळ्या विठूरायाची दर्शन ओढ.

पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण सोहळा . आपण नुसते माझं माझं करीत बसतो अन् गोल गोल तिथंच फिरत राहातो. हा आध्यात्मिक रिंगण सोहळा जणू ओम पूर्णमद पूर्णमिंद पूर्णात पूर्णमुदच्येते

याचि जाणिव करुन देतो. पूर्णातून पूर्ण काढल्यावर काय उरते ? हेच गोल रिंगण सोहळा शिकवतो. वारक-यांत ऊर्जा देण्याचे बळ रिंगणीत असते. येळवीतून माळशिरसी माऊली थाटामाटात विराजमन.
राम कृष्ण हरी माऊली

आपलाच रिंगणी प्रा. रवींद्र कोकरे ९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!