सुप्रभात…..आज ४ जुलै नात्यागोत्याचा मेळ वैष्णावांचा नातेपूते मेळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ जुलै २०२२ । फलटण । आपल्यातील मोहमायी व स्वार्थी नात्यातून मुक्त होऊन आपण श्रीविठ्ठलाचे होतो तेच नातेपूते. सातारा जिल्ह्यातील बरडचा मुक्काम आटोपून साधूबुवाचा ओढा येथे वैष्णव  वारे वाटेवर हर्ष चालती. साताराकर अत्यंत भावमयतेने , भरलेल्या नयनांनी ह्दयी निरोप देताना कालवाकालव होते. पण सोलापूरकर भाविक तोफेची सलामी देऊन माऊलीचे तन्मयतेने स्वागत करतात.
धर्माची धर्मपूरी , मायेच कारुंडे , पानसकरवाडी अशी वाटचाल सुरु होते. दूरवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिखराचा राजा शंभू महादेव शिंगणापूर वारकरी दर्शन घेतात.
सांजवेळी नातेपूतेकर माऊलीच स्वागत सहकुटुंब सहपरिवार करताना आनंदी आनंद दिसतो. पंढरी समीप. विठूरायाची दर्शनी ओढ. वारकरी थकवा व प्रपंच विसरुन हरिजागारात दंग. टाळ मृदंगाचा गरज. नामाचा जयघोष. फडावरील कीर्तन सोहळे यात नातेपूतेकर दंग होऊन जातात.
आपलाच नात्यातला प्रा. रवींद्र कोकरे
९४२१२१६८२१

Back to top button
Don`t copy text!