
दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२२ । फलटण । पुणे जिल्ह्यातील वाल्हे मुक्काम उरकून श्रींचे शाही निरास्नान करुन सातारा जिल्ह्यात शिंग तुतारीच्या निनादात आगमन.
लोणंद मंजे आनंद परमसुख घेणं. (लो आनंद ) श्रीविठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तिरसाने परमानंदी होतो व तो आनंद इतरांना देतो. पालखी सोहळ्यात अडीच दिवसाचा मुक्काम असतो. वायदेश , कोकण पट्टा येथून भक्तांची माऊली दर्शने येतात.
लोणंद ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठी कांदा बाजारपेठ आहे. जातीवंत पशूधनाची खरेदी विक्री होते. व्यापारी , शेतकरी माऊली सोहळ्यात अन्नदानासाठी सरसावलेले असतात.
क्रांतीजोती सावित्रीमाई फुले यांचे खंडाळा तालुक्यातील नायगांव हे जन्मस्थान आहे. मुलींसाठी शिक्षणांचा श्री गणेशा करुन ज्ञानवारी सुरु केली. त्याच मार्गाने हा ज्ञानियांचा सोहळा मार्गस्थ होतो. लोणंदकरांच्या सेवेत वारकरी तल्लीन होऊन जातात.
आपलाच लो आनंदी प्रा. रवींद्र कोकरे
९४२१२१६८२१