दैनिक स्थैर्य । दि. २६ जून २०२२ । फलटण । आपण पायी चालतो तेव्हा तो प्रवास होतो, श्रद्धापूर्वक चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भक्तीभावाने भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते.
जीवनाचा प्रवास कसा करावा ते आपणच ठरवायचं. जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो ती जेजुरी असा भावार्थ आहे. आपण सुद्धा
देवा तुझी सोन्याची जेजुरी
गडाला नऊ लाख पायरी
सासवडचा एकादशी , द्वादशी (बारंस) मुक्काम उरकून पालखी बोरावके मळा , यमाई शिवरी , साकुर्डे मार्गी जेजुरी येथे विसावते. त्यावेळी सूर्यास्त वेळी पिवळ्याजर्द भंडा-याने माऊली सोहळा सोनेरी होऊन जातो. वारकरी मल्हार वारी सह अभंगाची सुरावट ऐकू येते. भंडारा बुक्का एकीची दर्शन घडते. वारकरी गडावर जाऊन म्हाळसाकांत खंडेरायाचे दर्शन पर्वणीच वाटते. खोबरे भंडारा उधळणे , दिवटी पाजळणे यातून हेचि सूचित होते की, आपल्या खडतर जीवनात परिश्रम करुन यश मिळाल्यास आपणही यशाच्या शिखरावर जाऊन आपला जयजयकार केला जातो. दिवटी पाजळणे मंजे अंधकाराकडून उजेडात वाटचाल. हेच गड जेजुरी सांगतो.
आपलाच सदानंदी प्रा.रवींद्र कोकरे
९४ २१ २१ ६८ २१