दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२२ । फलटण । आज आषाढ शुद्ध द्वितीया , महाराष्ट्र कृषिदिनी तरडगांवचा मुक्काम आटोपून माऊली सकाळी काळज येथे विराजमन होते. महाराष्ट्र तमाशा पंढरी म्हणून नावलौकिक असणारे काळज खरंच लोककलावंताला आश्रय देते. महाराष्ट्राच्या भूमीला वारी अन् बारी यांची थोर परंपरा आहे. लावणी भूलली अभंगाला याची प्रचिती येते. श्री . दत्तात्रेय ,श्री. खंडेराया प्राचीन मंदिराचा इतिहास आहे. सुरवडी , निंभोरे ओढा , वडजल असे मार्गक्रमण करुन माऊली दक्षिण काशीत विराजमन होते.
हरिबुबांचा पदस्पर्श पावनभूमी , बाणगंगातिरी श्रीराम दर्शने गुलाबजलांचे शिंपण याने शाही स्वागत संस्थानिक पद्धतीने केले जाते.
विमानतळवर माऊली विराजमन झाल्यावर या भव्य पटागंणावर आध्यात्मिक ज्ञानसोहळे सुरु होतात. राहुटी मध्ये दीर्घ पालखी टप्पा व अर्ध्यावाटेवर पंढरी यांचे गुणगान सुरु होते. राम कृष्ण हरी या सुरावटीने धरतीला पाठ टेकताच शांत निद्रा ही खरी वारकरी समृद्धी लाभते. पंढरीशी जाता माहेर भेटी गा जीवा.
आपलाच वारीसेवक प्रा. रवींद्र कोकरे
९४२१२१६८२१