दैनिक स्थैर्य | दि. १० डिसेंबर २०२४ | सातारा |
सातारा पोलीस दलामार्फत सुरू करण्यात आलेल्या सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींनी अकोला येथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा २०२४- २०२५ मध्ये ४ सुवर्ण, १ रजत, १० कांस्यपदक अशी एकूण १५ पदकांची लयलूट केली. या विजेत्यांपैकी ४ सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची दिल्ली येथे होणार्या ६८ व्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
सुवर्ण पदक :-
बॉक्सींग :- दि. २२/११/२०२४ ते दि.२८/११/२०२४ रोजी अकोला महाराष्ट्र येथे १४ वर्षाखालील मुले, १७ व १९ वर्षा खालील मुले / मुली यांची आयोजित शालेय राज्यस्तरीय बॉक्सींग स्पर्धा २०२४ २०२५
- यश भगवान निकम (३०-३२ किलो गट) शालेय राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड.
- दिव्यंशु दिग्वीजय डुबल (३०-४० किलो)
- शौर्य योगेश बनकर (४८-५० किलो गट) शालेय राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड.
- प्रांजल दिपक रावळ (७५-८१ किलो गट) शालेय राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड.
- दृपता तारासिंग सुद (४२-४४ किलो गट) शालेय राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड.
रौप्य पदक :- कांस्य पदक :-
१. समृद्धी विकास शिंदे ( ४५-४८ किलो गट)
२. श्रावणी जितेंद्र भोसले ( ५४-५७ किलो गट)
३. जान्हवी भरत कडव (६३-६६ किलो गट)
४. श्रुती सतिश शिंदे (६६ – ७० किलो गट)
५. समृद्धी सतिश शिंदे (५२-५४ किलो गट)
६. अपुर्वा प्रशांत कदम (५४-५७ किलो गट)
७. सोहम शशिकांत मोरे (४९-५२ किलो गट)
८. पृथ्विराज पंकज शिंदे (५६-६० किलो गट)
९. राज शंकर निकम (६०-६४ किलो गट)
१०. ऋशिकेश अनिल आपटे (७५-८० किलो गट)
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी येथे प्रशिक्षण घेणार्या प्रशिक्षणार्थी यांना सुनिल सपकाळ स्पोर्ट इन्चार्ज / प्रबोधिनी व्यवस्थापक, सॅम्युअल भोरे सहा. स्पोर्ट इन्चार्ज / प्रबोधिनी व्यवस्थापक, एन.आय.एस बॉक्सींग प्रशिक्षक पो.हवा. सागर जगताप व महिला प्रशिक्षक महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा शिंदे हे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण देत आहेत.
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील पदकप्राप्त प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांची उल्लेखनिय कामगिरीबाबत समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, अतुल सबनीस पोलीस उपअधीक्षक (गृह), राजु शिंदे, राखीव पोलीस निरीक्षक, सुनिल चिखले, पोलीस उपनिरीक्षक पोलीस कल्याण व मानवी संसाधन कार्यालय सातारा यांनी अभिनंदन केले आहे. तसेच यापुढे होणार्या स्पर्धांकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.