फलटण कृषी महाविद्यालयात बारावी पास/नापास विद्यार्थ्यांसाठी कृषी डिप्लोमा करण्याची सुवर्णसंधी; १३ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० जून २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीचे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत मुक्त कृषी शिक्षण केंद्र कृषी महाविद्यालय, फलटण येथे बारावी पास/नापास विद्यार्थ्यांसाठी कृषी डिप्लोमा करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली आहे. या संधीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रात आपले करिअर घडवून उज्ज्वल यश संपादन करावे, असे आवाहन कृषी महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.

या कृषी डिप्लोमासाठी प्रवेश पात्रता बारावी पास अथवा नापास विद्यार्थी, माळी प्रशिक्षण प्रमाणपत्रधारक व महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या बारावी समक्ष अभ्यासक्रमधारक अशी आहे.

कृषी डिप्लोमा उत्तीर्ण झाल्यानंतर संधी पुढीलप्रमाणे –

  • महाराष्ट्र शासन अंतर्गत कृषी सहाय्यक, कृषी सेवक, ग्रामसेवक पदाकरीता पात्र
  • शासनमान्य रोपवाटीका व्यवसाय परवाना व कृषी सेवा केंद्र व्यवसाय परवाना मिळविण्यास पात्र
  • नगरपालिका व महानगरपालिकेमध्ये कृषी विभागांमध्ये विविध पदांसाठी पात्र
  • खाजगी कृषी कंपन्यांमध्ये विविध संधीयशस्वी उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

कृषी महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये –

फलटण कृषी महाविद्यालयात अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग असून सुसज्ज इमारत व आधुनिक प्रयोगशाळा आहे. कृषी अभ्यासक्रमाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन, शैक्षणिक भेटी व प्रशिक्षण येथे दिले जाते. मधुमक्षिकापालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, जैविक खते, रोपवाटिका व्यवस्थापन, रेशीम उद्योग यांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. महाविद्यालयाला प्रात्यक्षिकांसाठी सर्व सोयी-सुविधांयुक्त २५० एकरचे प्रक्षेत्र उपलब्ध आहे.

१३ जून २०२३ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रा. ए. डी. पाटील (७५८८६२७३२३) व श्री. ए. आर. सोनवलकर (७५८८२२१४४४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!