युवतींसाठी सुवर्णसंधी; क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्यावतीने मिळणार मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण; वाचा सविस्तर


दैनिक स्थैर्य | दि. 11 डिसेंबर 2024 | फलटण | येथील क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने सातारा जिल्ह्यासह इतर ठिकाणी राहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार महिलांच्या हाताला काम मिळावे म्हणून मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवासे यांनी दिली.

याबाबत माहिती देताना नेवसे म्हणाले कि; ज्या महिला ह्या सुशिक्षित आहेत परंतु त्यांच्या हाताला काम नाही. अश्या महिलांना काम मिळण्यासाठी आवश्यक असणारे विविध कोर्स हे क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी सुशिक्षित बेरोजगार महिलांनी पुढील कागदपत्रांच्यासह क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे :

  1. फोटो – २

  2. १० वी, १२ वी मार्कशीट

  3. आधार कार्ड

  4. पॅन कार्ड

  5. ई-मेल आयडी

  6. बँक पासबुक

  7. वयाची अट : १८ ते २६ वर्षे

संपर्कासाठी पत्ता :

“क्रांतिसूर्य” प्रतिष्ठान,

सुनील मेडिकल शेजारी, मोती चौक,

रविवार पेठ, फलटण.

9822010346


Back to top button
Don`t copy text!