दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२१ । मुंबई । मागील आठवड्यात अमेरिकन ट्रेझरी उत्पन्नात आठवड्यात घसरण दिसून आल्याने स्पॉट गोल्डचे दर ०.९ टक्के नफ्यावर स्थिरावले. तर एमसीएक्सवरील सोन्याचे दर १.३ टक्क्यांनी वाढले असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरण बैठकीत मालमत्ता खरेदी प्रोग्राम लवकरच होणार असल्याचे संकेत मिळाले. वाढती महागाईची चिंता, बेरोजगारीची वाढती आकडेवारी ही फेडसाठी अजूनही मोठी चिंतेची बाब ठरली आहे. तथापि, चलनधोरण आणखी कठोर न होण्याच्या संकेतांनंतर अमेरिकन डॉलर आणि ट्रेझरी उत्पन्नावर दबाव आला. डेल्टा व्हेरिएंटच्या कोव्हिड-19 रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याने प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये लॉकडाऊनची चिंता आहे. परिणामी जागतिक सुधारणा लांबणीवर गेल्याने सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याला आधार मिळाला.
क्रूड तेल: मागील आठवड्यात डब्ल्यूटीआयचे क्रूडचे दर २.२ टक्क्यांनी वाढले. येत्या काही महिन्यांत ओपेकने तेलाच्या उत्पादनाबाबत अस्पष्ट भूमिका दर्शवल्याने बाजाराच्या भावनांवर परिणाम झाला. सौदी अरेबिया, तेल निर्यातक समूहाचा नेता आणि यूएईने करार करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर तेल निर्यातक समूह जागतिक मागणी पुरवण्याकरिता उत्पादन वाढीच्या करारापर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरले.
डेल्टा व्हेरिएंट रुग्णांमुळे आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील अनेक भागात महामारीसंबंधी कठोर निर्बंध असल्याने क्रूड तेलावर आणखी दबाव आला. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या आकडेवारीनुसार, मागील आठवड्यात सुरुवातीला अमेरिकी क्रूडसाठ्यात ६.९ दशलक्ष बॅरलची घसरण झाली. ही घट बाजाराच्या अंदाजानुसार ४ दशलक्ष बॅरल एवढी होती. या घसरणीमुळे क्रूडच्या नुकसानीला मर्यादा आल्या.